Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सहस्रलिंग येथे घराजवळ मोटार सायकल लावण्यावरुन हाणामारी

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । घराच्या बाजुला मोटार सायकल का लावली, या कारणावरुन सहस्रलिंग येथे तूफान हाणामारी झाली. रावेर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की घराच्या बाजुला मोटर सायकल का लावली या कारणा वरुन सहस्रलिंग येथे तूफान हानामारी काल रात्री झाली.यामुळे सुनिल जाधव वय २३ रा सहस्त्रलिंग यांच्या फिर्यादी वरुन आरोपी सताब मोहीते, यशवंत मोहीते, हरदेव मोहीते,तिघे रा सहस्त्रलिंग तसेच हजाब मोहीते, शाणु मोहीते, बसुदेव मोहीते रा. लालमाती तसेच सुभाष बेलदार, संतोष बेलदार, संतोष चव्हाण रा. नेपानगर या नऊ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ महेबुब तडवी तपास करीत आहे.

 

Exit mobile version