Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात कोर्टासमोर दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोर्टात आल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रावेर कोर्टासमोर घडली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्या परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या फिर्यादीनुसार, विनोद रामदास कोळी (वय-३३) रा. नायगाव ता. मुक्ताईनगर हा त्याचा मित्रांसोबत सोमवार १३ जून रोजी रावेर कोर्टात आले होते. त्यावेळी कोर्टाजवळून जात असतांना ईश्वर संतोष कोळी, दिपक वासूदेव कोळी आणि पूनम ईश्वर कोळी सर्व रा. कांडवेल ता. रावेर यांनी कोर्टात असल्याच्या कारणावरून दोघांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तर विनोद कोळी याच्या डोक्यात दगड मारून शिवीगाळ केली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात विनोद कोळी यांच्या फिर्यादीवरून  ईश्वर संतोष कोळी, दिपक वासूदेव कोळी आणि पूनम ईश्वर कोळी सर्व रा. कांडवेल ता. रावेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीवरून पूनम ईश्वर कोळी (वय-२८) रा. कांडवेल ता. रावेर या पती ईश्वर संतोष कोळी यांच्यासोबत सोमवार १३ जून रोजी रावेर कोर्टात आले होते. कोर्टात केस असल्यामुळे ते कोर्टाजवळ आले असता समाधान ज्ञानेश्वर कोळी आणि विनोद रामदास कोळी दोन्ही रा. नायगाव ता. मुक्ताईनगर यांनी विवाहितेसह पतीला मारहाण करण्यास सुरूवात केली. तर जीवेठार मारण्या धमकी दिली. याप्रकरणी पूनम कोळी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात समाधान ज्ञानेश्वर कोळी आणि विनोद रामदास कोळी दोन्ही रा. नायगाव ता. मुक्ताईनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस नाईक सुरेश मेढे करीत आहे.

 

Exit mobile version