Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शोपियांमध्ये चकमक, दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । जम्मू- काश्मीरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत  दोन सुरक्षा जवान शहीद झाले आहेत. तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शोपियां जिल्ह्यातील जैनापुरातील चेरमार्ग भागात ही चकमक झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनापुरातील चेरमार्ग भागात  दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा जवानांनी या परिसराची घेराबंदी करुन सर्च ऑपरेशन सुरु केले होते. याच दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. सुरक्षा जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी ठार झाला. अद्याप ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. या कारवाईत मारण्यात आलेला दहशतवादी परदेशी असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. ही चकमक सुरू असून त्यात रोमित तानाजी चव्हाण आणि संतोष यादव असे दोन जवान शहीद झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते, असेही त्यांनी नमूद केले.

 

Exit mobile version