Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना व शिंदे गटात तुफान हाणामारी

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वर्चस्वाची लढाई वेगवेगळ्या पातळ्यांवर लढली जात असतांना बुलढाण्यात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे.

 

उद्धव ठाकरेंकडून बुलढाण्यात नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून या पदाधिकार्‍यांचा सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात अचानक प्रवेश करत गोंधळ घातला. या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. काही पदाधिकार्‍यांना यात मारहाण झाली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले. आम्हीच शिवसेना असा दावा करत आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी सत्कार कार्यक्रमात धुडगुस घातला. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना हटवावं लागलं. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

Exit mobile version