Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सानुलीच्या उपचारासाठी आई बापाचा नियतीविरुद्ध लढा (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | हे सुंदर जग पाहण्यासाठी प्रत्येकालाच गरज असते सुदृढ डोळ्यांची. डोळ्यांच्या माध्यमातूनच जगाचं सौंदर्य आपल्या नजरेस पडत असतं. मात्र अवघ्या अकरा महिन्याच्या सानुलीचं सुख हिरावून घेणाच्या प्रयत्नात असणाऱ्या नियतीविरुद्ध बापाचा लढा सुरू आहे..

जळगाव जिल्ह्यात, भुसावळ तालुक्यातील ‘बेलवाडा’ येथील रहिवासी असलेले गिरीश भंगाळे हे दुध फेडरेशन येथे कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर काम करतात. घरी हालाखीची परिस्थिती असलेल्या भंगाळे कुटुंबाला हितेश नावाचा तीन वर्षाचा एक मुलगा आहे. पण या कुटुंबाला मुलीची भारी हौस. देवानेही त्यांच्या पदरात मुलीचं दान देत कुटुंबाचा चौकोन पूर्ण केला. मात्र नियती परीक्षा घ्यायला उभी ठाकली. सर्व सुरळीत होत असल्याचं वाटत असतांनाच अचानक घरातील लाईट गेली.

अवघ्या तीन महिन्याच्या मानसीकडे त्यांचे लक्ष गेले. तेव्हा सानुल्या मानसीचे डोळे मांजरीच्या पिल्ल्यासारखे चमकू लागले. हा प्रकार पाहून त्यांनी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे दाखवले. विविध तपासण्या केल्या आणि धक्कादायक बाब समोर आली. सानुल्या मानसीच्या दोन्ही डोळ्यात कॅन्सरच्या गाठी असल्याचे निदान डॉक्टरांनी केलं.

तिच्या जगण्याचा, दृष्टी जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आणि जवळ असेल नसेल ती ती रक्कम खर्च करत, उधार उसनवारी करत नंतर इतरांकडे विविध ट्रस्टकडे मदतीसाठी हात पसरत हैदराबाद येठेल ‘सेंटर फॉर साईड’ या होस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरु झाली. सुरवातीला डोळा काढावा लागू शकतो असे म्हणणाऱ्या डॉक्टरांनी केमो, लेझर थेरपीद्वारे प्रयत्न करत एका डोळ्याचे ऑपरेशन केले. सुदैवाने डोळा वाचला. काही प्रमाणात त्या एका डोळ्याने तिला दिसू लागलय. मात्र अजून धोका टळलेला नाही. दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशनसह अजून ५ वर्षांपर्यंत ट्रीटमेंट सुरु असणार आहे.

परिस्थती माणसाला हतबल करते. आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या सानुल्या मानसीसाठी आपल्याला मदतीचा हात मिळावा यासाठी गिरीश भंगाळे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शब्द टाकला, वेगवेगळ्या ट्रस्टच्या भेटी घेत मदत मागितली पण महाराष्ट्राच्या बाहेर ट्रीटमेंट सुरु असल्यामुळे मदत देता येणार नाही असं उत्तर मिळत होतं.

पुढील पाच वर्ष ट्रीटमेंट सुरू राहणार आहेत. मात्र प्रश्न पुढच्या सहा महिन्यांचा आहे त्यासाठी दरमहा किमान सतरा अठरा हजार रुपयांची गरज आहे. त्यांची आर्थिक परिस्थितीमुळे हतबल भंगाळे हतबल आहे. आता काय करावं असा यक्षप्रश्न समोर गिरीश यांच्यापुढे पडला आहे. त्यामुळे असतील नसतील त्या ट्रस्टकडे मदत मागायला सुरुवात केलीये. ते अजूनही मदतीच्या अपेक्षित आहे. जळगाव येथील मणियार बंधू यांनी एका माहिण्याची मदत केलीये. सानुल्या मानसीसाठी भंगाळे त्यांना मदत करणं आपल्या हाती आहे. कृपया आपल्या परीने शक्य असेल तर अवश्य मदत करा. मदतीसाठी गिरीश भंगाळे यांना ‘98057 06747’ या क्रमांकावर संपर्क साधा.

व्हिडीओ लिंक :

 

Exit mobile version