Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात साजरा

WhatsApp Image 2019 06 21 at 10.39.47 AM 1

जळगाव (प्रतिनिधी ) आज पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त श्री. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात शालेय विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी सामुहीक योग केला. याप्रसंगी महापौर सिमा भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एस. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्य) बी. जे. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, पंतजलीचे हेमंत चौधरी यांच्यासह सहभागी संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

 हा कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन, उच्च शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, एन. सी. सी., एन. एस. एस., स्काऊड गाईड, जिल्हा हौशी योगा असोसिएशन, जळगाव, जिल्हा हौशी फुटबॉल असोसिएशन, पगारीया आयुर्वेद-पंतजली मेगा स्टोअर, भारत स्वाभिमान, जी. एम. फांऊडेशन, पंतजली योग समिती, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फांऊडेशन, जळगाव, जयकिरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पाचोरा, क्रीडा भारती, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन, इंडियन रेडक्रास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन करण्यात आले. योग दिन कार्यक्रमात शहरातील ३० पेक्षा अधिक शाळेतील सुमारे ३ हजार विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. पतंजली योग समिती, जिल्हा हौशी योगा असोसिएशनचे सदस्य, नागरीक, महसुल, जिल्हा परिषद, महानगरपालिका व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार खेळाडु अशोक माधवराव चौधरी, अंजली भाऊसाहेब पाटील. शिवछत्रपती पुरस्कार संघटक / कार्यकर्ता प्रा.डॉ.नारायण खडके, .गणपत पोळ, डॉ.प्रदिप तळवेलकर. एकलव्य पुरस्कार खेळाडू कांचन चौधरी, योगशिक्षिका अनिता पाटील आदि उपस्थित होते. पतंजली योग समितीचे हेमंत चौधरी, राजेंद्र महाले, समाधान बरकले यांनी योगासने करुन घेतले. आभार जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी मानले.

Exit mobile version