Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेश मार्केटमधील कापड दुकानांना भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील केळकर मार्केटजवळील मधील कापड दुकानांना शार्टसर्कीटमुळे मोठ्या प्रमाणावर आग लागल्याची घटना रात्री घडली आहे. याआगीत लाखो रूपयांचे कापड जळून खाक झाले आहे. याठिकाणी अग्निशमन बंबाच्या पथकाकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील केळकर मार्केटजवळील गणेश मार्केट मधील कापड दुकानांना शुक्रवारी ११ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. यात मार्केटमधील राजेश मोतीरामानी व गिरीश मोतीरामानी यांचे  सारीका साडीया, सारीका टॉप, सारीका टेक्सटाईल दुकानात कापड, साडी व लेडीज ड्रेस यांना मोठ्या प्रमाणावर आग लागली. यामध्ये लाखो रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. यावेळी महापालिकेचे अग्निशमन विभागाचे तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. यावेळी साधारणपणे गणेश मार्केट हे तीन मजली आल्याने आगीचे लोळ हे तिसऱ्या मजल्या पर्यंत जात होते.

 

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आग विझविण्याचे काम सुरू होते. दरम्यान ही आग शार्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्केटमधील व्यापाऱ्यांचा होलसेलचा व्यवसाय असल्यामुळे दुकानाच्या बाहेर मालाचे गठ्ठे ठेवले होते. या गठ्ठे देखीलजळून खाक झाली आहे. या आगीचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Exit mobile version