Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे जगन्नाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारपासून महोत्सव

faizapur 1

फैजपूर प्रतिनिधी । येथील सतपंथ मंदिर संस्थानचे ११ ब्रह्मलीन गादीपती संत श्री जगन्नाथ महाराज यांचा अष्टादश पुण्यतिथी महोत्सव येत्या दि.१३ आणि १४ डिसेंबर रोजी संत महात्म्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे.
दि.१३ डिसेंबर शुक्रवार रोजी संध्याकाळी ५ ते ७ ब्रह्मलीन श्री जगन्नाथ महाराज यांची पुण्यतिथी महापूजा, दि.१४ डिसेंबर शनिवारी सकाळी साडेसात वाजता भव्य शोभायात्रा सकाळी ९.३० ते १० पूर्वाचार्य समाधी पूजन सकाळी १० ते १२ संतांचे अमृतवचन व सतपंथ दिनदर्शिका २०२०चे प्रकाशन व चोपडा येथील अमर संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी १२ ते २ समाधी स्थळ येथे (मंदिराच्या शेतात) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. असा प्रकारे या महोत्सवाची रूपरेषा असणार आहे.

या महोत्सवाला अनंत विभूषित श्रीमद जगद्गुरू सतपंथाचार्य ब्रह्मलीन नानकदासजी महाराज यांचे आशीर्वाद तर प्रेरणापीठ पिराणा येथील प.पु. श्रध्येय महंत ज्ञानेश्वरदासजी महाराज, वडताल येथील प.पु.श्रध्येय सदगुरु शास्त्री धर्मप्रसाददासजी महाराज, सावदा येथील स्वामिनारायन गुरुकुलचे प.पु. श्रध्येय सदगुरु शास्त्री भक्तीप्रकाशदासजी, पाल येथील वृंदावन धाम प.पु.श्रध्येय संत गोपाल चैतन्यजी महाराज, सावदा दत्त मंदिर येथील प.पु.श्रध्येय महंत मानेकर बाबा शास्त्री, फैजपूर येथील खंडोबा देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, कुसुंबा श्रीराम मंदिरचे प.पु.श्रध्येय महंत भरातदासजी महाराज, श्रीक्षेत्र डोंगरदे प.पु.श्रध्येय स्वरूपानंद महाराज, ब्रम्हाकुमारी शकुंतला दीदी फैजपूर, ह.भ.प.धनराज महाराज अंजाळेकर, समस्त सतपंथ मुखी परिवार महाराष्ट्र, गुजराथ, मध्यप्रदेश यांच्यासह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

या महोत्सवात सहभागी होऊन गुरुसेवेचा लाभ घ्यावा, असे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, सतपंथ मंदिर संस्थान, सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांनी आवाहन केले आहे.

Exit mobile version