Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांद्रा येथे मुलाकडून बापाला मारहाण; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द मुलाकडून बापाला लाकडी फावड्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायंकाळी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकीराम दगडू सोनवणे (वय-६५) रा. नांदुरा खुर्द ता.जि जळगाव हे मुलगा हिरामण सोनवणे यांच्यासह राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून मुलगा हिरामण सोनवणे हा काही एक कामधंदा करीत नसल्याने वडील जानकीराम सोनवणे हे चिंतेत होते. याबाबत रविवारी २ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जानकीराम सोनवणे यांनी मुलगा हिरामण याला कामधंदा का करत नाही असा जाब विचारला. याचा राग हिरामणला आल्याने त्याने घरात असलेल्या लाकडी फावड्याने वडील जानकीराम यांना मारहाण बेदम मारहाण केली. यात त्याचा हाताचा पंजा मोडून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी जानकीराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मुलगा हिरामण जानकीराम सोनवणे याच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साहेबराव पाटील करीत आहे.

Exit mobile version