Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भीषण अपघात : नदीत कोसळली बस !

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासगी बस नदीत कोसळल्याची दुर्घटना आज पहाटे घडली असून यात एका प्रवाशाच्या मृत्यू तर २५ जण जखमी झाले आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, एक खासगी ट्रॅव्हल्स बस शेगाव वरून पुण्याच्या दिशेनं निघाली होती. बस चिखली रोडवरील पेठ जवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास १५ फूट खोल नदीत ही बस कोसळली. आज पहाटे घडलेल्या या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. यानंतर जखमींना जवळच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version