Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘नांदगाव’ येथील ग्रामरोजगार सेवक यांच्या गैरव्यवहाराबाबत उद्या उपोषण

बोदवड प्रतिनिधी | ‘रोजगार हमी योजने’अंतर्गत ‘नांदगाव’ येथील ग्राम रोजगार सेवक यांनी गैरप्रकारबाबत केल्याबद्दलची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने यांनी केली होती. मात्र त्यावर संबंधित अधिकारी यांनी चौकशी व कारवाई न केल्याने आसने यांनी उद्यापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

तालुक्यातील ‘नांदगाव’ येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी ‘निमखेड’ शिवारातील ‘गट क्रमांक १६३’मध्ये त्यांचे वडिल बाबुराव लक्ष्मण निकम यांच्या नावे असलेल्या ‘रोजगार हमी योजने’अंतर्गत विहिरीचे अनुदान लाटले असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने यांनी केली होती त्यावर संबंधित अधिकारी यांनी चौकशी व कारवाई न केल्याने ते पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे.

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने यांनी, “दि.०४ ऑक्टोबर २०२१ रोजी गौतम बाबुराव निकम यांनी सन २०१२-२०१३ व बाबुराव लक्ष्मण निकम यांनी सन २०१५-२०१६ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे अनुदान घेतले होते. परंतु निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ पैकी ‘९० आर’मध्ये १ विहीर खोदकाम व बांधकाम न करता शासनाचा निधी लाटला आहे.” अशी तक्रार दाखल केली होती, संबंधित अधिकारी यांनी चौकशी व कारवाई न केल्याने पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास दि.०१ फेब्रुवारी रोजी बसणार आहे.

सदर लाभार्थी गौतम बाबुराव निकम हे नांदगाव येथे ग्राम रोजगार सेवक असून त्यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून विहिरीचे लाभामध्ये गैरप्रकार केलेला आहे तरी संबंधित लाभार्थीवर कारवाई व शासनाच्या निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

Exit mobile version