Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथे पंचायत समितीसमोर रोजगार सेवकांचे विविध मागण्यांसाठी उपोषण

पारोळा प्रतिनिधी ।  पंचायत समितीच्या आवारात ग्रामरोजगार सेवकांचे विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची नगराध्यक्ष करण पवार यांनी भेट घेत मागण्या जाणून घेतल्या. खा.उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी सवांद साधून विषय मार्गी लावण्याची विनंती केली. जिल्ह्याधिकारी राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 अंतर्गत काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना गावात विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे याबाबत युनियन मार्फत वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरूपाच्या समस्या मांडून त्यांचे निराकरण न झाल्याने ग्रामरोजगार सेवकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

उपोषणकर्त्याची नगराध्यक्ष करण पवार यांनी भेट घेत त्यांच्या मागण्या समस्या आणि व्यथा जाणून घेतल्या गटविकास अधिकारी विश्वासात घेत नाही, अरेरावी करतात आवेशात बोलतात, अश्या व्यथा नगराध्यक्ष करण पवार यांच्याजवळ ग्रामरोजगार सेवकांनी मांडल्या.  विविध मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली. यावर नगराध्यक्ष पवार यांनी खा.उन्मेष पाटील व जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे सवांद साधून आपण स्वतः जातीने लक्ष घालून ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या मार्गी लावण्याची विनंती केली. त्यावर जिल्ह्याधिकारी राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यकार्यकारी आधिकारी डाँ.पंकज आशिया यांना सूचना देवून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तर खासदार पाटील यांनी देखील जिल्हास्तरावर बैठक घेवून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वस्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, नगरसेवक बापू महाजन, पी.जी. पाटील भैय्या चौधरी उपस्थित होते.

या आहेत मागण्या

मुंदाणे प्र.उ. येथील ग्राम रोजगारसेवक सूर्यभान पाटील यांच्यावर बेकायदेशीरपणे कामावरून कमी करण्याचा तक्रारी अर्ज निकाली काढावे, १६ मार्च २०२१ पासून ते ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतचे ग्रामरोजगार सेवकांचे थकीत मान धन मिळावे, ग्रामरोजगार सेवकांचे थकित असलेले टी.ए.डी.ए. बिल मिळावे, नमुना एक मजूर नोंदणी  फॉर्म ,नमुना चार कामांची मागणी फॉर्म ,नमुना सात मजुराला काम दिलेल्या बाबतचा फार्म, जॉब कार्ड प्रत वरील विषयानुसार स्तरावरून समस्या योग्य निराकरण करण्यात यावे.

याबाबत जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, तालुका अध्यक्ष शरद पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर भोई, युनियन चे सदस्य लहू पाटील, सूर्यभान पाटील, रमेश वंजारी, जगदीश पाटील, दत्तात्रय पाटील, कविता पाटील, समाधान पाटील ,संजय पाटील ,जगदीश पाटील ,प्रदीप पाटील, विनोद सैंदाणे, उत्तम पाटील, योगेश पाटील, हिरालाल पाटील ,भरत राठोड, नाना पाटील, प्रमोद पाटील ,सुनील पाटील, अजित पाटील, राहुल पाटील, रामदास पाटील, भूषण महाजन, उमेश पाटील ,कैलास पाटील, प्रकाश पाटील ,ज्ञानेश्वर पाटील, नंदू पाटील ,सजन पाटील, शिवदास खैरनार, अनिल पाटील, विकास पाटील, योगेश पाटील ,भीमराव जावळे आदी ग्राम रोजगार सेवक उपोषणात सहभाग नोंदविला.

Exit mobile version