Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात नेरी येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कॉंगेसचे आमरण उपोषण (व्हिडीओ)

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी जम्बो उपोषण कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू केले होते. मृदजल संधारण विभागाचे डेप्युटी इंजिनिअर एस. डी. निकम व तहसिलदार कैलास चावडे यांनी तात्काळ कारवाई लेखी आश्वासन नंतर शेतकऱ्यांचे उपोषण सोडले.

पाचोरा तालुक्यातील नेरी गावातील २०० शेतकऱ्यांची शेती गडद नदीच्या पलीकडे भडाळी शिवारात आहे. गेल्या चार वर्षांत मृद संधारण विभागाने चुकीचा सर्वे करुन बंधारा बांधला त्यामुळे सदर चा रस्ता हा नेरी ते सार्वे ग्रामीण असुन तो पाण्यात गेल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, २०० शेतकऱ्यांचे गडद नदीपात्रात फर्शी नसल्याने होणारे नुकसान तात्काळ थांबवा, स्व. धर्मा नामदेव बेडर या शेतकऱ्याच्या वारसास आर्थिक मदत तात्काळ मिळावी.

यासह परिसरातील विविध मागण्यांसंदर्भात पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण तहसिल कार्यालयासमोर समोर आज दि. २१ रोजी सुरू केले होते. तहसिलदार कैलास चावडे यांनी संबंधित विभागाला लेखी आदेश दिले यात जिल्हा परिषद ने तात्काळ पुलासाठी अंदाज पत्रक तयार करून शासनाने कडे पाठवण्यात येवुन मृद संधारण विभागाने तात्काळ चौकशी करावी. तसेच स्व. धर्मा बेडर यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात येईल. असे आश्वासन तहसीलदार कैलास चावडे यांनी उपोषणकर्ते शेतकऱ्यांना दिले. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष शेतकरी नेते सचिन सोमवंशी यांना उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी म्हणून तहसिलदार कैलास चावडे यांनी सरबत देऊन उपोषण सोडले.

यावेळी मृदजल संधारण विभागाचे उपविभागीय अभियंता एस. डी. निकम, नायब तहसिलदार संभाजी पाटील, शिवसेनेचे शेतकरी प्रमुख अरुण पाटील, हरीभाऊ पाटील, राजेंद्र महाजन, इरफान मनियार, शरीफ शेख, राहुल शिंदे, गणेश पाटील, अमजद खान उपस्थितीत होते. नेरी येथील शेतकरी काशिनाथ अहीरे, बंटी भोई, याकुबखा पठाण, सुनिल पाटील, विजय सुर्यवंशी साहेबराव बोरसे, आधार गढरी, दादा मोरे, हेमराज बोरसे, सुरेश गढरी, जिभाऊ पाटील, मुकुंदा पाटील, विमल अहीरे, सकुबाई भोई, सरु पाटील, दगुभाई भोई, शरीफाबाई पठाण, मालाताई मोरे, बालू भोई, बंडु भोई, तुकाराम भोई, भगवान भोई आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Exit mobile version