Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हवामानातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी शिरीष बर्वे यांचे उपोषण

जळगाव प्रतिनिधी । क्लायमेट चेंज म्हणजे हवामानातील बदलाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येथील ख्यातनाम वास्तु विशारद शिरीष बर्वे हे आजपासून आठ दिवसांचे उपोषण करत आहे.

आर्किटेक्ट शिरीष बर्वे हे आधीपासूनच पर्यावरणीय बदलांबाबत संवेदनशील असून याबाबत त्यांनी अनेकदा आंदोलन केली आहेत. यात प्रामुख्याने शहराच्या बाहेरून जाणार्‍या महामार्गाबाबत त्यांनी आंदोलन केले होते. यानंतर अलीकडेच प्रभात चौकातील अंडरपास हा अशास्त्रीय पध्दतीने उभारण्यात येत असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. यानंतर आजपासून त्यांनी एक अभिनव आंदोलन सुरू केले आहे.

आर्किटेक्ट शिरीष बर्वे हे आजपासून क्लायमेट चेंज अर्थात हवामानातील बदलांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आठ दिवसांचे उपोषण करत आहेत. क्लायमेट चेंज हा अतिशय गंभीर विषय असला तरी याकडे कुणी फारसे लक्ष देत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, शिरीष बर्वे यांच्या या आंदोलनास लाईव्ह ट्रेंडस न्यूजने पूर्ण पाठींबा जाहीर केला आहे. काही महिन्यांपूर्वी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या कार्यालयास शिरीष बर्वे यांनी भेट दिली असता आमचे सल्लागार संपादक सुरेशजी उज्जैनवाल यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांनी क्लायमेट चेंज आणि आपल्या जीवनावरील याचे परिणाम याबाबत चर्चा केली होती. आता याच मुद्यावरून ते आंदोलन करत असून आम्ही याला पूर्णपणे पाठींबा दर्शवत आहोत.

 

shirish barve, shirish barve jalgaon, jalgaon, jalgaon latest news, jalgaon news

Exit mobile version