Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फुटबॉलच्या राज्य कार्यकारिणीवर फारुक शेख विशेष आमंत्रित म्हणून नियुक्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) म्हणजेच महाराष्ट्र राज्याची फुटबॉल संघटनेची एकमेव कार्यकारणी असून ती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन शी संलग्न आहे अशा या विफा च्या कार्यकारणीवर २०२३ ते २०२७ या चार वर्षाच्या कालावधीसाठी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुक शेख यांची कायम विशेष आमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्य कार्यकारिणीच्या प्रत्येक सभेत ते विशेष आमंत्रित म्हणून सहभागी राहतील.
महाराष्ट्र राज्याच्या फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे खासदार प्रफुल पटेल यांनी स्वीकारली असून त्यांच्या नेतृत्वात पूर्ण कार्यकारणी बिनविरोध निवडून आलेली आहे. त्यात पाच उपाध्यक्ष, एक सचिव, एक खजिनदार,३ सहसचिव व १३ कार्यकारणी सदस्य निवडून आलेले आहे.

राज्याचे नवनिर्वाचित सचिव सोलापूरचे डॉक्टर किरण चौगुले व वरिष्ठ उपाध्यक्ष नागपूरचे हरेश व्होरा यांनी फारुक शेख यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळी नवनिर्वाचित खजिनदार लातूरचे सलीम परकोटे व माजी सचिव सॉवटर वॉज हजर होते.

फारुक शेख यांच्या निवडीबद्दल राज्याचे अध्यक्ष प्रफुल भाई पटेल, जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे मुख्य आश्रय दाते अशोक भाऊ जैन व अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील सह जिल्हा फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version