Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये शेतकऱ्यांनी करावी रब्बी पिकांची नोंदणी

खामगाव प्रतिनीधी | “रब्बी हंगामातील पिकांचीसुद्धा पीक पाहणीची नोंद सर्व खातेदारांनी आपल्या मोबाईल वरती ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून करावी” असे सर्व शेतकरी बांधवांना तालुका प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेल्या पिकांची पीक पाहणी स्वतः मोबाईल ॲपद्वारे करणेकरिता 15 ऑगस्टपासून महाराष्ट्र शासनाने पिक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला होता.

खरीप हंगामामध्ये खामगाव तालुक्यातील बहुसंख्य खातेदारांनी आपल्या शेतातील खरीप पिकाची नोंदणी ई पीक पाहणी मोबाईल ॲपवर रजिस्ट्रेशन करून स्वतः भरली आहे. ई पीक पाहणी मोबाईल ॲप हे मराठीमध्ये असून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे.

रब्बी पिकांचा पेरा शेतामध्ये झालेला आहे त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची सुद्धा पीक पाहणी ची नोंद सर्व खातेदारांनी आपल्या मोबाईल वरती ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून करावी असे सर्व शेतकरी बांधवांना तालुका प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे

Exit mobile version