Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई हवीच : उध्दव ठाकरे

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दर हेक्टरी ५० हजार रूपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज औरंगाबादेच्या दौर्‍यावर होते. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली.  यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात उध्दव ठाकरे म्हणाले की,   आता नुसती घोषणाची अतिवृष्टी सुरू आहे.  या सरकारकडे भावनाचा दुष्काळ आहे. कृषिमंत्री आले नाही, मुख्यमंत्री आले नाही. हे उत्सवी सरकार आहे, उत्सवमग्न सरकार आहे. फक्त उत्सव साजरे करत आहे. मी उत्सव साजरे करा असं म्हणत नाही. पण उत्सव साजरे करत असताना आपल्या राज्यातील जनता समाधानी आहे की नाही, हे पाहण्याचे काम सरकारचे आहे. हे सरकार अपयशी ठरत आहे’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली.

 

ठाकरे पुढे म्हणाले की, आमच्या काळात एनडीआरएफचे निकष बदलण्यात आले होते. जनतेची मागणी हेक्टरी ५० हजार रुपये इतकी आहे आमचा त्याला पाठिंबा आहे. शेतकर्‍यांना याच निकषानुसार भरपाई मिळायला हवी. शेतकर्‍याचे प्रश्न बाबत बोलताना ठाकरे म्हणाले की शेतकर्‍याच्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगत या सरकारला पाझर फुटत नसेल तर तर त्यांना घाम फोडेल असा इशारा देखील त्यांनी दिला.

Exit mobile version