Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाडी येथील शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कापसाचे पैसे मिळाल्याशिवाय उपोषण संपवणार नसल्याची भूमिका तालुक्यातील वाडी येथील ६० शेतकऱ्यांनी धरल्याने उपोषणाचा आज आठवा दिवस उगवला आहे.

तालुक्यातील वाडी येथील ६० शेतकऱ्याच्या ११७१ क्विंटल कापसाचे पैसे स्थानिक व्यापारी राजेंद्र भिमराव पाटील हे गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या कुटूंबीयासह पसार झाले असून शेतकऱ्यांचे ८५ लाख ९६ हजार ३८३ रुपये घेऊन पसार झाला आहे. यातील इंद्रशींग दौलत राजपूत या शेतकऱ्याने २८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मात्र गेल्या चार महिन्यांपासून आरोपी सापडत नसल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश खोंडे, रणजित पाटील, रविंद्र पाटील हे पथक आरोपीच्या शोधासाठी नाशिक, धुळे व जळगाव येथे जाऊन माघारी फिरले, शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून जागृत मंचचे अध्यक्ष निळकंठ पाटील, बाळकृष्ण पाटील यांचे नेतृत्वाखाली वाडी येथील आपल्या मुलाबाळांसह उपोषण सुरू केले आहे, उपोषण स्थळी पोलिस उपाधिक्षक भारत काकडे, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, संजय वाघ, अमोल शिंदे यांनी भेटी देऊन उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला या शिवाय पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनीही भ्रमणध्वनीवर संपर्क साधून उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र उपोषण कर्ते कापसाचे पैसे मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे ठाम असल्याने आज उपोषणाचा आठवा दिवस आहे.

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी उधारीवर कापसाचे बियाणे, औषधे, खते घेतल्याने संबंधित व्यापाऱ्याचा पैसे मागण्यासाठी तगादा लावला आहे, शिवाय दुसऱ्या वर्षाचा खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतीची मशागत कशी करावी व पेरणी कशी होईल या विवंचनेत शेतकरी आल्याने उपोषण सुटता सुटेनासे झाले आहे.

उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – 

गणेश पाटील (गोराडे); इंद्रसिंग पाटील; प्रभाकर पाटील; सुरेश पाटील (पवार); सुरेश शिंपी (टेलर); विनोद धोबी; रमेश्वर गायकवाड (गायके); पंढरीनाथ पाटील(गायके); संजय पाटील (खमाट); कृष्णराव पाटील; प्रविण मोगरे (पाटील); जगदिश पाटील; संपत पाटील; रमेश पाटील; दिलीप तळेकर (पाटील); विजय धोबी;  रमेश गोराडे (पाटील); नामदेव पाटील; अनिल पाटील; किशोर पाटील; मनोज पाटील; आत्माराम (नंदू) गव्हांडे; संदीप पाटील (गोराडे); भिकन पाटील; किशोर खमाट; तुळशिराम पाटील; संतोष पाटील (पवार); माधवराव पाटील (गोराडे); भागवत पाटील (मिसाळ); लक्ष्मण पाटील; राजेंद्र पाटील; भागवत पाटील (गोराडे); अशोक पाटील; विकास पाटील; गोपाल पाटील; विठ्ठल पाटील (तळेकर); प्रविण पाटील; संदिप पाटील; संजय पाटील; कृष्णाराव पाटील (मिसाळ); दत्तू पाटील (तळेकर); बाजीराव पाटील; सुनिल पाटील; भूषण (आबा) पाटील; अशोक पाटील; योगेश पाटील; पंकज पाटील; गोपाल पाटील; राजेंद्र पाटील; भागवत पाटील; भागवत पाटील; अरूण पाटील; केशव पाटील; किरण पाटील; सुभाष साठे; अशोक पाटील (गोराडे); राजेंद्र पाटील; भिवसन पाटील; जगन्नाथ पाटील; बाळू पाटील असे उपोषणकर्ते आहेत.

 

Exit mobile version