Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकर्‍यांनी निर्यातीचे तंत्र अवलंबल्यास नफ्याची शाश्वती – खासदार रक्षा खडसे ( व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 02 28 at 2.47.38 PM

रावेर (प्रतिनिधी)। पॅकेजिंगवर निर्यातीचे तंत्र शेतकऱ्यांनी अवलंबल्यास शेतीतील नफ्याची श्वाश्वती मिळू शकेल, केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे, अवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. येथील मराठा मंगल कार्यालयात कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या सयुंक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या.

 

चौदा शेतकर्‍यांचा केला सत्कार
आयोजित कार्यक्रमात शेतीमध्ये उकृष्ट काम करणाऱ्या सुमारे 14 शेतकर्‍यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला तर दोन बचत गटाला पुरस्कारही देण्यात आला. या मेळाव्यात विविध कंपन्यांची कृषी संदर्भात स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी आलेल्या शेतकऱ्यांना विविध कंपन्याची कर्मचारी शेती अवजारे, औषध फवारणी, केळीच्या खोडापासून तयार केलेले वस्तु या मेळाव्याच्या स्टॉलमध्ये लावण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून आलेले कृषी तज्ञांनी उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन करून शेतीचे महत्व यावेळी पटवून दिले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
झेडपी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, कृउबा समिती सभापती राजीव पाटील, अमोल पाटील, पाल कृषी विज्ञान केंद्राचे सजंय महाजन, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, वसंत महाजन यांच्यासह मोठ्या संखेने शेतकरी, बचत गटच्या महिला उपस्थित होते.

पहा- व्हिडीओ मेळाव्याबाबतचा हा व्हिडीओ.

Exit mobile version