Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंचोली येथे भरधाव ट्रकच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथे गाव रस्त्यावर शेताबाहेर दुचाकीसह उभ्या असलेल्या शेतकऱ्याला चुकीच्या बाजूने येवून भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. त्यांना तत्काळ ग्रामस्थांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना संध्याकाळीच त्यांचा मृत्यू झाला आहे. 

अधिक माहिती अशी की, शिवाजी कडू पाटिल (वय-६५) रा. चिंचोली ता.जि.जळगाव कुटूंबीयांसह वास्तव्यास असून शेतकरी आहेत. 

आज बुधवारी दुपारी ते नेहमी प्रमाणे दुचाकीने शेतात गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास शेताला लागून असलेल्या रस्त्यावर दुचाकीजवळ उभे असतांना चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (जी.जे.१८अे.यु.७५६०) वरील चालकाने दुचाकीसह शेतकऱ्याला फरफटत शेतात नेले. यात शिवाजी पाटिल गंभीर जखमी झाल्याने तशाच अवस्थेत ट्रकवरील चालक आणि त्याचा साथीदार दोघांनी धुम ठोकली. जखमी झालेल्या शिवाजी पाटील यांना  ग्रामस्थांनी उपचारार्थ जळगावी हलवले. उपचार सुरु असतांना सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रकचालका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

Exit mobile version