Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वनदूत जावरिया यांना सेवानिवृत्ती निमित्त हृद्य निरोप

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात वनदूत म्हणून कार्यरत असणारे डी. के. चावरिया यांना सेवानिवृत्तीनिमित्त वन खात्यातर्फे हृद्य निरोप देण्यात आला.

रावेर सामाजिक वनिकरणचे प्रभारी अधिकारी दिवालसिंग किसनसिंग ( डी. के. ) जावरीया यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वनअधिकारी जावरिया वाकडी ता. जामनेर येथील रहीवासी असुन वनपाल व वनक्षेत्रपाल म्हणून ३९ वर्ष उत्कृष्ट सेवा दिली आहे. त्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा वन विभागातर्फे गौरव देखील करण्यात आला आहे.

त्यांनी देवझीरी,वैजापूर, शिरपुर,पाल,रावेर,सहस्रलिंग,चोपडा भागात सेवा दिली आहे.सेवा बजावत असतांना जंगलाचे अस्थित्व अबाधित राखण्यासाठी त्यांनी खुप परिश्रम घेतले होते.आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वनपाल उज्वला पाटील वनपाल प्रभारी वनक्षेत्रपाल सुरेश वनारसे, सरपंच किर्ती पाटील, हरी पाटील, राजू परदेशी, जिवन रायमळे, प्रविण पाटील, ग्राम सेवक शाम पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version