Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौटुंबिक वाद : पतीकडून पत्नीवर तिक्ष्ण हत्याराने वार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कौटुंबित वादातून माहेरी राहत असलेल्या पत्नीवर तिक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याचा प्रकार तालुक्यातील अट्रावल येथे मध्यरात्री घडला आहे. यावल पोलीस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील अट्रावल येथील माहेर असलेल्या योगिता खुशाल बोरसे यांचा विवाह भुसावळ येथील खुषाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे यांच्याशी झालेला आहे. दरम्यान त्यांचा कौटुंबिक वाद असल्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून योगिता ह्या अट्रावल येथे आई-वडिलांकडे राहते. या काळामध्ये खुशाल बोरसे याने पत्नी योगीताशी वेळोवेळी फोनवर संपर्क साधून शिवीगाळ व दमदाटी केली आहे. दरम्यान, मंगळवार २१ जून रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास खुषाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे आणि त्याचा मित्र अरविंद कांबळे हे दोघेजण घरी येऊन योगिता बोरसे हिला धारदार शस्त्राने वार करून जखमी केले तर भांडण सुरू सोडविण्यासाठी योगिताचे वडील अर्जुन सुरेश भिल आणि आई यांनी धाव घेतली असता त्यांना देखील दुखापत केली आहे. याबाबत अर्जुन सुरेश भिल यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून खुशाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे आणि अरविंद कांबळे दोन्ही राहणार भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विनोद खांडबहाले करीत आहे

 

Exit mobile version