Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वडजी येथे कुटुंबाला बेदम मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडजी येथील कुटुंबाला मागील भांडणाच्या कारणावरून पाच जणंनी  शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. भडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम देवराम मोरे (वय-५६) रा. वडजी ता. भडगाव हे आपल्या मुलगी ज्योती व पत्नी अंजनाबाई वास्तव्याला आहेत.  ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पुरुषोत्तम मोरे हे त्यांच्या वडजी शिवारातील शेतात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी गावातील शिरीष देवराम मोरे याने मागील भांडणाचे कारणावरून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आशाबाई शिरीष मोरे, चंद्रमणी शैलेश मोरे, मायाबाई देवराम मोरे, छायाबाई देवराम मोरे रा. वडजी ता. भडगाव यांनी अंजनाबाई आणि मुलगी ज्योती यांना मारहाण केली. याप्रकरणी पुरुषोत्तम मोरे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मनोज माळी करीत आहे.

 

Exit mobile version