Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हवामान विभागाचा अंदाज खोटा : मान्सूनपूर्व पावसाची खान्देशात हुलकावणी

जळगाव,  लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावर्षी राज्यात २० ते २५ मे दरम्यान बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागणार असून नेहमीपेक्षा मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पण तो २८ मे उजाडूनही मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली असून हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरला आहे.

यावर्षी जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात नेहमीपेक्षा तापमान बरेच होते. जळगाव जिल्ह्यात यावर्षी सर्वात जास्त तापमान असून आतापर्यंत तीन उष्णतेच्या लाटां तर चौथी लाट सुरु आहे. मे महिन्यात सर्वात जास्त तापमान या कालावधीत नोंदवले गेले आहे. गेल्या शे-सव्वाशे वर्षात सर्वाधिक उष्णतामान म्हणून यावर्षी नोंद झाली असून एप्रिल २००९ आणि एप्रिल २०१० असे सलग दोन वर्षात सर्वात जास्त तापमान नोंद आहे.

दरवर्षी मार्च ते मे दरम्यान बेमोसमी पावसासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडतात. परंतु यावर्षी जानेवारी नंतर एकदाही बेमोसमी पाऊस आलेला नाही. ग्लोबल वार्मिंगमुळे हे प्रथमच होत असल्याचे दिसून येत आहे.

बेमोसमी पावसामुळे नुकसान होत असले तरी मे महिन्यात येणारा मान्सूनपूर्व पावसामुळे शेतमशागतीसाठी शेतकऱ्याच्या फायद्याचा मानला जातो. शिवाय बागायती मान्सून पूर्व कपाशी वाणाची लागवड करण्यासाठी देखील उपयोगी असतो. परंतु यावर्षी बेमोसमी पावसात ९० टक्क्याहून अधिक घट झाली असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.

राज्यात सांगलीसह अन्य काही भाग वगळता मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात हजेरी लावली परंतु अन्य ठिकाणी कोठेही पाऊस झाल्याचे दिसून आलेले नाही. गेल्यावर्षी मे महिन्यात काहि ठिकाणी बऱ्यापैकी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती.

४ जून पर्यंत पावसाची शक्यता नाही
यावर्षी फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत रखरखीत तापमान असून हवेतील आर्द्रता देखील कमी असल्याने उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात जाणवून येत आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त तापमान ३० एप्रिल २००९ – ४७ अंश, २३ एप्रिल २०१० रोजी ४८ अंश, अशी नोंद झाली आहे. यावर्षी ४६.५ अंश तापमानापर्यंत नोंद झाली आहे. तसेच ४ जून पर्यंत तरी पावसाची शक्यता नाही. मात्र २९ ते २ जून दरम्यान तापमानात अल्पश प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आहे.
निलेश गोरे. हवामान अभ्यासक, वेलनेस वेदर फौंडेशन भुसावळ.

Exit mobile version