Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्रिकेट स्पर्धेत ‘फैजपुर शिवमुद्रा संघ’ विजयी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथे स्व. निलेश पाटील व स्व. जयाताई आर. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल खुल्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना फैजपूर येथील शिवमुद्रा क्रिकेट संघाने जिंकला तर मालोद येथील एनटीआर क्रिकेट संप अंतिम फेरीत उपविजेता ठरला आहे.

किनगाव तालुका यावल येथील केपीएल क्रिकेट संघाव्दारे मालोद रोड वरील खुल्या प्रांगणावर स्व . निलेशभाऊ पाटील आणी स्व .जयाताई पाटील यांच्या स्मरणार्थ खुल्या मर्यादीत षट्कांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे एक महिन्यापासुन सुरू असलेल्या या स्पर्धत यावल तालुका व परिसरातुन ४२ संघाची आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धचा अंतीम सामना शिवमुद्रा क्रिकेट क्लब, फैजपुर व मालोद येथील एनटीआर क्रिकेट संघा दरम्यान खेळला गेला. यात मालोद च्या संघाने ८षट्कात चार बाद ४७ केल्या होत्या यास उत्तर देतांना फैजपुर च्या शिवमुद्रा संघाने पाचव्या षट्कात दोन बाद ४८धावसंख्या करीत अंतीम सामना जिंकला.

अंतीम सामान्यातील प्रथम विजेता फैजपुरच्या संघास जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामदास गोंडु पाटील (आरजी नाना) व जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या अरूणामाई  पाटील , निलेश आर पाटील यांच्या हस्ते प्रथम पारितोषीक स्व. निलेश पाटील स्मृतीचषक व २१ हजार रुपयांचे बक्षीस तर अंतिम सामन्यातील उपविजेता मालोद संघास स्व.जयाताई आर पाटील स्मृतीचषक व ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर अंतीम फेरीच्या उपांतपुर्व सामान्यातील विजेता भुसावळ येथील संघास तृत्तीय क्रमांकाचे बक्षीस ७ हजार ७८६ रूपये व स्मृतीचिन्ह देण्यात आली.

या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास पंचायत समीतीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील, किनगावचे सरपंच भुषण पाटील, प्रगतीशील शेतकरी चंद्रकांत विठ्ठल चौधरी, संजय पाटील या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन तडवी यांनी केले. या स्पर्धस यशस्वी करण्यासाठी केपीएल क्रिकेट संघाचे रफीक तडवी, सचिन तडवी, सागर तडवी, शरीफ तडवी, मुन्ना तेली, दगडु तडवी , जहाँगीर तडवी व महेबुब पिंजारी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version