Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर बसस्थानकावरील हिरकणी कक्ष ठरतेय ‘शो-पिस’

hirakani kaksha

फैजपूर प्रतिनिधी । महाराष्ट्र सरकारने मोठा वाजागाजा करत संपूर्ण राज्यातील बस स्थानकात हिरकणी कक्ष बसवण्यात आले. मात्र येथील बस स्थानकावर बसविण्यात आलेले हिरकणी कक्ष केवळ शो-पिस ठरले असून, महिला वर्गाला त्याचा कुठलाच फायदा होत नाही आहे. हे हिरकणी कक्ष लावण्यामागचे कारण काय ? त्याचे उद्देश काय ? असे विविध प्रश्न उपस्थितीत होऊ लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फैजपूर बस स्थानकावरील इमारतीच्या पहिल्याच रांगेत अतिशय मध्यभागी हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहे. हिरकणी कक्ष उभारण्यामागील उद्देश एवढाच की, लहान बालकांना स्तनपान करण्यासाठी एकांत मिळावा म्हणून हे हिरकणी कक्ष लावण्यात आले आहे. मात्र 4 ते 6 महिने उलटल्यावर सुद्धा हिरकणी कक्ष बंद अवस्थेत आहे. उलटपक्षी या हिरकणी कक्षामुळे त्याच्या अवतीभोवती घाणीचे साम्राज्य होऊ लागले आहे. हिरकणी कक्षात कुठल्याच सुविधा पुरवण्यात आलेल्या नसून हे हिरकणी कक्ष केवळ नावापुरतेच तर लावले नाही ना ? ते लावण्यामागे काही आर्थिक हितसंबंध तर नाही ना ? असे विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. महामंडळाने एकतर हिरकणी कक्ष सुरु करुन महिला वर्गाला सुविधा उपलब्ध करून द्याव्या अन्यथा ते होत नसल्यास कक्ष काढून टाकावे. त्यामुळे या ठिकाणी होणारे खाणीचे साम्राज्य तरी दुर होईल. अशी मागणी प्रवाश्यांकडून करण्यात येत आहे.

हिरकणी कक्ष आहे की देखावा, हेच अजूनपर्यंत महिलांना समजले नाही. कारण त्या हिरकणी कक्षावर कोणत्याच प्रकारचे चित्र अथवा माहिती नाही त्यात बसण्यासाठी कुठलीच सुविधा एस.टी महामंडळाने उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे लहान बाळांना स्तनपानासाठी हिरकणी कक्ष आहे. हे माहीतच नाही यामुळे एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.

Exit mobile version