कृषी धन प्रदर्शनानिमित्त विविध स्पर्धा व प्रदर्शन

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे कृषीधन प्रदर्शनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा आणि मिलेट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. रांगोळी स्पर्धेचा विषय – ’शेती व शेतकरी ’रांगोळी स्पर्धेत ७२ स्पर्धकांनी भाग घेतला. प्रथम क्रमांक युक्ता खर्चे फैजपूर .द्वितीय क्रमांक ललित महाजन फैजपूर .तृतीय क्रमांक युगल भंगाळे खिरोदा. तसेच लहान गटामध्ये प्रथम क्रमांक यज्ञा पाटील फैजपूर .द्वितीय क्रमांक लावण्या कगाड मोठे वाघोदे .तृतीय क्रमांक भक्ती पवार आश्रम शाळा लोहारा .यांनी मिळविला.

दरम्यान, मिलेट मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ७०० स्पर्धकांनी सहभाग घेतला( मुलांसाठी पाच कि.मीटर व मुलींसाठी ३कि.मीटर) या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक अयान खान फर्दापूर. द्वितीय क्रमांक योगेश कोळी भालोद. तृतीय क्रमांक कृष्णा भाटे जामनेर. व मुलींमध्ये प्रथम क्रमांक अश्विनी काटोल जळगाव .द्वितीय क्रमांक आरती भालेराव थोरगव्हाण. तृतीय क्रमांक जान्हवी रोझोदे जळगाव यांनी यश मिळविली.

कृषिधन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या हस्ते करण्यात आले सोबत आमदार शिरीष दादा चौधरी, कुरबान तडवी , बीडीओ दिपाली कोतवाल ,रावेर. गायकवाड मॅडम बीडीओ यावल ,युवा नेते धनंजय चौधरी , संस्थेचे सचिव अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन पर कार्यक्रमात प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक महेश महाजन यांनी केले. प्रमुख पाहुणे पंजाबराव डक यांनी आपल्या भाषणामध्ये शेतकर्‍यांनी निसर्गावर आधारित शेती करायला हवी तसेच निसर्गाने तयार केलेले झाडे प्राणी यांच्यामार्फत हवामानाचा व पावसाचा कसा अंदाज बांधता येईल हे स्पष्ट केले. प्रत्येकाने वाढदिवसाला एक झाड लावून पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी त्याची मदत होईल .तसेच संभाजी पवार यांनी शासनामार्फत मिळणार्‍या योजनांचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा तसेच आपल्या आहारामध्ये तृणधान्यांचे महत्त्व सांगितले.
अध्यक्षीय भाषणामध्ये आमदार शिरीष दादा चौधरी यांनी शेतकर्‍यांचे हित हेच आमचे हित आहे असे सुतोवाच केले . तेव्हा डख साहेबांनी वेळोवेळी येऊन आमच्या भागातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे व जेणे करून आमच्या भागातील शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही.
कार्यक्रमाचे आभार डॉ.धीरज नेहेते यांनी मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी तृणधान्यावर आधारित कृषि विभागामार्फत पथनाट्य सादर केले. समारंभात परिसरातील शेतकरी, महिला शेतकरी ,तरुण शेतकरी उपस्थित होते. त्याचबरोबर प्राचार्य व्ही आर पाटील, पी. आर. चौधरी ,जनता शिक्षण मंडळ सचिव प्रभात चौधरी, आर एल चौधरी, तसेच तापी परिसर विद्या मंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुधाकर झोपे सर पारधी सर. वाणी सर .गोविंदा अत्तरदे सर . सातपुडा विकास मंडळ व मधु स्नेह परिवाराचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Protected Content