Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फडणवीस सरकारमुळे प्रत्येक नागरिकावर 54 हजार 400 रुपयांचे कर्ज

mumbai cm devendra fadanvis bjp

मुंबई (वृत्तसंस्था) जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रावरील कर्जात अडीच पटीने वाढ झाली आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रावर तब्बल 6 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यानुसार प्रत्येक नागरिकावर 54 हजार 400 रुपयांचे कर्जाचे ओझे आहे.

 

महाराष्ट्रावरील कर्जाचा आकडा 4 कोटी 71 लाखांहून वाढून 6 कोटी 71 लाखांवर गेल्याची माहिती समोर आली आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रावर तब्बल 6 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास साडेबारा कोटी इतकी आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकावर 54 हजार 400 रुपयांचं कर्ज आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांच्या काळात अडीच पटीने हे कर्ज वाढले आहे. 2014 मध्ये आघाडी सरकार पायउतार झाले, त्यावेळी महाराष्ट्रावर 2 लाख 69 हजार कोटींचे कर्ज होते. 2019 पर्यंत त्यात 4 लाख 2 हजार कोटींची भर पडून हा आकडा 6 लाख 71 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Exit mobile version