Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजच होणार फडणवीस व शिंदे यांचा शपथविधी ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आजच अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदांची शपथ घेऊ शकतात अशी माहिती आता समोर आली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे दुपारी सव्वादोनच्या सुमारास मुंबईला पोहचले. ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी त्यांची भेट घेणार असून नंतर हे दोन्ही मान्यवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा दाखल करणार आहेत. शिंदे यांच्या मुंबईतील आगमनाप्रसंगी काहीही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून कडेकोटे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

दरम्यान, आतापर्यंत उद्या शपथविधी होणार असल्याचे मानले जात होते. मात्र ताज्या माहितीनुसार आज सायंकाळी वा रात्रीच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. आज या दोघांचा शपथविधी होणार असून उर्वरित सदस्य नंतर शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version