Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणाने केले फेसबूकवर मतदानाचे लाइव्ह प्रसारण

Facebook live

उस्मानाबाद (वृत्तसेवा) लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यात मतदान करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने चक्क फेसबूक लाइव्ह केल्याचा खळबळजनक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांविरोधात सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

 

मतदानाला जाताना मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नसून मतदानात गोपनीयता रहावी याकरिता म्हणून मतदानयंत्र एका बंद खोलीत ठेवलं जातं. परंतु,  राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने मतदान करताना फेसबूक लाइव्ह केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी त्याने राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आव्हानही केलं आहे. या तरुणाचे नाव प्रणव पाटील असल्याचं समजतं. हा प्रकार लगेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यास भाग पाडले. नंतर त्याच्या सोबत चार जणांविरोधात सायबर क्राइमचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही आगामी काळात सोशल मीडियाच्या वाढत्या वापराला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाला मतदान केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करणेची गरज पडणार आहे.

Exit mobile version