Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप आ. टी. राजा सिंह यांच्यावर फेसबुकची बंदी

 

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । हेट स्पीच बद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात कारवाई न करण्याबाबत आरोप झालेले असताना आता भारतीय जनता पक्षाच्या आमदाराविरोधात फेसबुकने कारवाई केली आहे.

फेसबुकने तेलंगणमधील भाजप आमदा टी. राजा सिंह यांना बॅन केले आहे. द्वेष आणि हिंसेला उत्तेजन देणाऱ्या मजकुराद्वारे फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या भाजप नेत्याला बॅन करण्यात आले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.

द्वेष परवणे आणि हिंसेला उत्तेजन देण्याच्या विरोधातील फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आम्ही राजा सिंह यांच्यावर आमच्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे, असे मेलद्वारे प्रसिद्ध केलेल्या एका निवदनात फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

Exit mobile version