Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रभारी विस्तार अधिकारी तडवी यांची नियुक्ती रद्द ! ; जि.प.अध्यक्षा रंजना पाटलांचे आदेश

रावेर प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीच्या प्रभारी विस्तार अधिकारीपदी हबीब तडवी यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी दिले आहे.

सविस्तर असे की, रावेरचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी हबीब तडवी यांना रावेर पंचायत समितीच्या प्रभारी विस्तार अधिकारी म्हणुन नेमणुक झाली होती. हबीब तडवी रावेरमध्ये २००८ मध्ये विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले होते. तर शासनाने त्यांची बदली यावल पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी या पदावर नोहेंबर-२०२० केली आहे. १२ वर्ष ते रावेर पंचायत समितीमध्ये कार्यारत होते. काही दिवसांपूर्वी हबीब तडवी यांची रावेर पंचायत समितित प्रभारी विस्तार अधिकारी म्हणुन नियुक्त झाली होती. दरम्यान या विषया संदर्भात जिल्हा परिषद ग्रामपंचायतचे बाळासाहेब गोटे यांनी सांगितले, की जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्याशी चर्चा झाली असून पुढील दोन दिवसात हबीब तडवी यांची रावेरची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे.

हबीब तडवी यांची रावेर पंचायत समितीत आगोदर १२ वर्ष कामाकाज संभाळला आहे. त्यानंतर यावल पंचायत समितीत बदली झाली असतांना पुन्हा रावेर पंचायत पंचायत समितीत नियुक्ती देवू नये असे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख बाळासाहेब गोटे यांना आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी काढले आहे.

Exit mobile version