Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हातातील मोबाईल धुमस्टाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील क्रीडा संकुलाजवळून दुचाकीवर बसलेल्या एकाने तरूणाच्या हातातील मोबाईल धुमस्टाईल लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजवळून रूपेश सुधाकर पाटील (वय-३१) रा. जामनेर हा तरूण ५ जून रोजी दुपारी ३ वाजेया सुमारास पायी जात असतांना दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून मागून आले. दुचाकीवरील मागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने रूपेशच्या हातातील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून लंपास केल्याची घटना घडली. रूपेशने आरडाओरड केली तोपर्यंत दोन्ही अज्ञात भामटे दुचाकीवरून पसार झाले. रूपेशने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

Exit mobile version