Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तरूणींची सुटका, तिघांवर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हेपानाचे येथील हॉटेल राजवाडामध्ये रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून २५ मिनीटांनी भुसावळ तालुका पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत हॉटेलचे मालक व व्यवस्थापकांकडून परप्रांतीय तीन तरूणींची सुटका करुन त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हेपानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंगवर तालुका पोलिसांनी रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून २५ मिनीटांनी छापा टाकला. या कारवाईत हॉटेल मॅनेजर पंडीत टोंगळे रा. कुऱ्हे पानाचे व मालक संभाजी एकनाथ पाटील रा. जामनेर हे स्वतःच्या फायद्याकरीता पिडीत महिलांना हॉटेलमध्ये बोलवून पैशांचे प्रलोभन देऊन देह व्यापार करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे निष्पन्न झाले. महिला पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मॅनेजर पंडित टोंगळे (वय-५६, कुऱ्हेपानाचे, ता. भुसावळ), मालक संभाजी एकनाथ पाटील (वय-४५ रा.जामनेर) आणि सुरेश बारकू सोनवणे या तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  देहविक्री करणाऱ्या तिन्ही परप्रांतीय तरुणींची सुटका करुन त्यांना महिला सुधार गृहात हलविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सतिष कुलकर्णी, वाहतूक शाखेच्या सहाय्यक फौजदार रुपाली चव्हाण, हवालदार प्रदिप पाटील, अनिल झुंझारराव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक सतिष कुळकर्णी करीत आहे.

Exit mobile version