कांद्याचे दर वाढल्याने निर्यातबंदी; सरकारचा निर्णय

 

मुंबई । सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशातील कांद्याच्या दरांमध्ये झालेली वाढ थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

डायरेक्ट्ररेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने एक नोटिफिकेशन काढून सगळ्या प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी असल्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे.

देशात कांद्याच्या किंमती वाढल्या आहेत. एवढंच नाही तर करोना काळात म्हणजेच गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. भारताने एप्रिल ते जून या कालावधीत १९.८ कोटी डॉलर किंमतीचा कांदा निर्यात केला. तर मागच्या संपूर्ण वर्षात ४४ कोटी डॉलर्सचा कांदा निर्यात झाला होता. भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका या देशांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होतो.

Protected Content