Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उजळाईवाडी येथे ज्वलनशील वस्तूच्या स्फोट ; ट्रकचालक ठार

Kolhapur blast

कोल्हापूर वृत्तसंस्था । कोल्हापुरातील उजळाईवाडी येथील टोल नाका जवळील उड्डाणपुलाखाली ज्वलनशील वस्तूच्या स्फोटात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना झालेल्या या स्फोटामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय गणपती पाटील (वय ५६ रा.न्यू गणेश कॉलनी जाधव वाडी कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पुणे- बेंगलोर महामार्गावर उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली पाटील यांच्या ट्रकचा एक्सेल फुटल्याने ते पुलाखाली उभे होते. पुलाखाली असलेल्या एका बेवारस वस्तूला त्यांनी लाथ मारली. त्यानंतर हा स्फोट झाला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटाच्या आवाजाने ट्रकच्या काचांना तडे गेले. याशिवाय परिसरातील घरांच्या काचाही फुटल्याचे सांगण्यात येत आहे. बॉम्बशोध पथक, श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी या घटनेचा शोध सुरु केला आहे. या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की आजूबाजूच्या घरांमध्येही त्याची दाहकता पोहोचली. आवाज नेमका कसला आहे, याची कल्पनाच अनेकांना आली नाही.

Exit mobile version