Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुलाबभाऊंसोबत गद्दारीचे कारण तर सांगा ; योगेश वाघ यांचा सवाल

yogesh wagh

 

धरणगाव (प्रतिनिधी) प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार विजयी करण्याचा अधिकार आहे. परंतू ज्या गुलाबराव पाटील यांनी भूतकाळातील सर्व कटू अनुभव विसरत लोकसभेला युती धर्म निभावत प्रामाणिकपणे मदत केली. युतीत सगळं आलबेल असतांना अवघ्या काही महिन्यात असे काय घडलेय की, गुलाबभाऊंसोबत गद्दारी किली जातेय?, असा भावनिक प्रश्न युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी विचारला आहे. धरणगावात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी त्यांनी युवा सैनिकांना अंग झटकून काम करण्याचे आवाहन केले. श्री. वाघ पुढे म्हणाले की, लोकसभेच्या वेळेस शिवसेना-भाजपने एकदिलाने काम केल्यामुळेच प्रचाराला अवघे काही दिवस भेटूनही उन्मेष पाटील यांना लाखोचे मताधिक्क्य भेटले. विधानसभेला शिवसेना देखील अशाच प्रामाणिक मदतीची अपेक्षा ठेऊन होती. परंतू आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातोय. आपल्याला याचे सडेतोड उत्तर गुलाबभाऊंच्या भल्यामोठ्या विजयाच्या रूपाने द्यायचे आहे. धरणगाव शहरातील प्रामाणिक भाजप आणि युतीवर प्रेम करणारे मतदार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे भविष्यात गुलाबभाऊंसोबत गद्दारी का केली? याचे उत्तर संबंधितांना मतदारच विचारातील, असे देखील श्री. वाघ म्हणाले.

Exit mobile version