मेहरूण परिसरातून लांबविला तरूणीचा महागडा मोबाईल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण येथील बंगाली गल्लीतून तरूणीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २७ मार्च रोजी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, “मेघना चैत्राम पाटील (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव या तरूणी आपल्या कुटुं‍बियांसह वास्तव्याला आहे. रविवारी, २७ मार्च रोजी सकाळी मेघना पाटील ह्या कामानिमित्त मेहरूण येथील महाजन नगरातील बंगाली गल्लीत गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यांनी परिसरात मोबाईलचा शोध घेतला. परंतू कुठेही मोबाईल आढळून आला नाही.”

मेघना पाटील यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील हे करीत आहे.

Protected Content