Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धमकी देत तरूणाचा महागडा मोबाईल व रोकडची जबरी लुट !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । झाडती घेण्याच्या बहाणा करून अज्ञात दोन जणांनी तरूणाला धमकी देत खिश्यातील महागडा मोबाईल आणि रोकड जबरी लांबविल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल झालाय.

 

सविस्तर माहिती अशी की, अभिलाष रमेश येवले (वय-२८) रा. भडगाव रोड, पाचोरा हा तरूण खासगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २८ मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पाचोरा जाण्यासाठी अभिलाष येवले हा तरूण शिरसोली नाक्यावरील नुक्कड वडापाव दुकानासमोर उभे होते. त्यावेळी दुचाकीवर अज्ञात दोन जण आले. त्यांनी झडती घेण्याच्या बहाणा करून अभिलाष येवले यांच्या खिश्यातील ३० हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि ६ हजाराची रोकड जबरी हिसकावून लांबविली. तसेच कुणाला काही सांगितले तर मारून टाकू अशी धमकी दिली. या संदर्भात अभिलाष येवले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी २८ मार्च रोजी रात्री दुचाकीवरील अज्ञात दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरासे करीत आहे.

Exit mobile version