Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातून तिघे २ वर्षासाठी हद्दपार

1karhad 14

जळगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्याची कायदा व सूव्येवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील तिघांना उपविभागीय दंडाधिकारी  यांच्या आदेशाने  दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

 

पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधून उपद्रवी इसमाची माहिती घेतली असता त्यांना वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पंकज उर्फ टेलर रामचंद्र चौधरी (रा. फुलगाव ता. भुसावळ), मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे बापू प्रल्हाद मेढे (रा. अंतुर्ली ता. मुक्ताईनगर) व भुसावळ शहर पोलिसांत समाधान उर्फ गोया अशोक निकम याच्यावर विविध प्रकाराचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. याबाबत अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, एस.डी. पी. ओ. गजानन राठोड यांच्या सूचनेनुसार संबंधित पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव अवलोकनार्थ उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ उपविभाग यांच्या आदेशाने तिघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version