Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी घोषीत

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील शिवाजी नाट्यगृह येथे मुक्ताईनगर तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक इ.ओ. पाटील ह्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात आले. यावेळी संघाची कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.

याप्रसंगी संघाचे गटनेते रावसाहेब पाटील उपस्थित होते.  या कार्यक्रमात मुक्ताईनगर तालुक्यातील  शिक्षक संघाच्या नुतन कार्यकारिणीची घोषणा रावसाहेब पाटील ह्यांनी केली. नुतन तालुकाध्यक्ष म्हणुन प्रविण पाटील तर सरचिटणीस म्हणुन हिरालाल कळस्कर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

तर कार्याध्यक्ष विकास पाटील, अतुल लोंढे, कोषाध्यक्ष सुधाकर मोरे, कार्यालयीन चिटणीस शेख नाजीम शेख अब्दुल्ला, महिला संघटक मनिषा पाटील यांच्याह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.  यावेळी

रावसाहेब पाटील अध्यक्ष प्रगती शिक्षक सेना गट,  आर जे.पाटील, राज्य उपाध्यक्ष म.रा.प्रा.शि.संघ, विनोद पाटील, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा.शि.संघ जळगाव, शिवव्याख्याते संदीप पाटील, ग.स. संचालक ए.टी.पवार, राजेंद्र साळुंखे, सचिन वाघ सभापती पारोळा सोसायटी, अशोक इसे उपाध्यक्ष पारोळा सोसायटी, दिपक पाटील, संचालक पारोळा सोसायटी, जामनेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सरचिटणीस अनिल माळी, प्रसिध्दीप्रमुख दिपक पालवे जामनेर, गोपाळ पाटील तालुकाध्यक्ष बोदवड, निना सोनवणे बोदवड, इतर तालुक्यातील तसेच मुक्ताई नगर तालुक्यातील श्रीकृष्ण धायडे, राजीव वंजारी, सुनिल अढांगळे, अरुण सवर्णे यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी आवर्जुन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मनोज लुल्हे तर सुत्रसंचालन श्री.विलास धनगर ह्यांनी केले.श्री.प्रविण पाटील ह्यांनी आभारप्रदर्शन केले.ह्यावेळी मावळते अध्यक्ष श्री.मनोज लुल्हे ह्यांचा सामुहिक सत्कार करण्यात आला. शिक्षक संघाचा वैभवशाली इतिहास असुन संघटनेच्या माध्यमातुन शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते.शिक्षकांना आर्थिक तसेच सामाजिक स्थैर्यप्राप्तीसाठी शिक्षक संघाने आजपर्यंत प्रयत्न केले असुन ह्यापुढेही संघटना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द राहील.

रावसाहेब

मुक्ताईनगर तालुक्यात शिक्षक संघाने आजपर्यंत उत्तम कामगिरी केलेली असुन जिल्हा ते राज्य पातळीवर शिक्षकांचे प्रश्न मांडायला सतत पुढाकार घेतलेला आहे. तालुक्यातील सर्वच शिक्षक तालुका संघाशी जोडल्याचे पाहुन मनस्वी आनंद होत आहे. ह्यापुढेही शिक्षक संघाच्या माध्यमातुन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहु.

– विनोद जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ,जळगाव

Exit mobile version