Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अत्याचार करणाऱ्‍या नराधमास फाशी द्या; तेली समाजातर्फे तीव्र आंदोलन

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धरणगाव येथे चंदुलाल मराठे याने दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच त्याला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पारोळा तहसील कार्यालयावर समस्त तेली समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येत असून यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे प्रशासनाकडे विनंती वजा मागणी आहे की, सदर घटनेचा तातडीने तपास पूर्ण करून कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात यावे; सदरचा खटला हा जलद गती न्यायालयामार्फत चालवण्यात यावा; सदर खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी ; पीडितेच्या कुटुंबाला संपूर्ण कायदेशीर संरक्षण मिळावे; पीडित बालिकेच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनामार्फत करण्यात यावा व पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी आणि पिडीत बालिकांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकरीत समावून घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

या प्रसंगी संजय चौधरी, अरुण चौधरी, कैलास चौधरी, अरुण चौधरी, अण्णा चौधरी, अमृत चौधरी, सुनील चौधरी, मुकुंदा चौधरी, भागवत चौधरी, भिका चौधरी, ईश्वर चौधरी, तेली समाज पंच मंडळ पारोळा, तेली समाज नवयुवक मंडळ पारोळा आणि समस्त तेली समाज पारोळा शहर व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

 

Exit mobile version