Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रकारांना ‘सुरक्षा किट’ वाटप करून जागतिक छायाचित्रण उत्साहात

जळगाव, प्रतिनिधी । जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त बुधवारी जळगाव शहरात प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्यावतीने कॅमेरा पूजन करण्यात आले.

सालाबादाप्रमाणे करण्यात येणारा कार्यक्रम यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी स्वरूपात घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, शहर संघटन मंत्री दिनेश जगताप, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशोक भाटिया, प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद तायडे यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. दरम्यान सर्वत्र संसर्गजन्य आजार पसरत असताना देखील आपल्या जिवाची पर्वा न करता बातमी आणि वृत्तपत्राचे छायाचित्र काढण्यासाठी फोटोग्राफर बांधव सतत सर्वांच्या पुढे असतात त्यामुळे स्वत:ची काळजी घेण्यासाठी ‘फोटोग्राफी डे’चे औचित्य साधत फाउंडेशनच्या वतीने छायाचित्रकारांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वाॅश अशी सुरक्षा किट देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सोशल डिस्टन्स चे काटेकोर पालन करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशनचे सहसचिव संधिपाल वानखेडे, अनिल केर्‍हाळे, पांडुरंग महाले, सचिन पाटील, सुमित देशमुख, जुगल पाटील, धर्मेंद्र राजपूत, भूषण हंसकर, नितीन नांदुरकर, रोशन पवार आदी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

शिवसेनेचे उप महानगर प्रमुख प्रवीण पटेल, आयाज मोहसिन, आबा मकासरे, योगेश चौधरी, गोकुळ सोनार, राहुल शिरसाळे, सुनील भोळे, उमेश चौधरी, विजय पाटील, जकी अहमद, कमलेश देवरे, सतीश जगताप, शुभम जगताप आदींनी कार्यक्रमासाठी उपस्थिती नोंदवली.

Exit mobile version