पहूर येथे संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी उत्साहात

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथे अहिर सुवर्णकार समाज आणि ग्रुप ग्रामपंचायत पहूर पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हॉटेलमध्ये  झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य  राजधर पांढरे हे  होते . प्रारंभी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले . यावेळी भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या प्रमोद भामेरे यांच्यासह उपस्थित जवानांचा सत्कार करण्यात .ग्रामीण रुग्णालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र भामेरे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे यांना राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने मिळालेल्या कोरोना योद्धा सन्मान २०२१ पुरस्काराबद्दल त्यांचाही समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, शैलेश पाटील, आर. बी.पाटील, अॅड. एस. आर. पाटील, अशोक दुसाने, कविवर्य विश्वनाथ वानखेडे, प्रमोद भामेरे आदींनी मनोगत संत नरहरी महाराज यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, उपसरपंच श्याम  सावळे, अशोक पाटील, रवींद्र मोरे, भरत पाटील, राहूल पाटील, गयास तडवी, संदीप बेढे, मनोज जोशी, रविंद्र घोलप, विवेक जाधव, जगन धनगर, चेतन रोकडे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

यशस्वितेसाठी भरत भामेरे, गजानन भामेरे, चंद्रकांत सोनार, सुभाष सोनार, संजय बाविस्कर, प्रदीप भामेरे, शंकर सोनार, रतन भामेरे, अशोक मोरे, नाना सोनार, भैय्या सोनार, ईश्वर सोनार, गजानन सोनार, मनोज सोनार, भागवत सोनार, ललीत सोनार यांच्यासह सुवर्णकार समाज बांधवांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले. आभार गिरीष भामेरे यांनी मानले. यावेळी कोरोनाविषाणू संक्रमणाच्या अनुषंगाने शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.

 

Protected Content