Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुरभि महिला मंडळाचा ‘२०वा’ वर्धापनदिन उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुरभि महिला मंडळाचा नुकताच २० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. मंडळाने दरवर्षीप्रमाणे सामाजिक जबाबदारीचे भान राखून अनाथ आणि गरजू मुलांना मदत करून  वर्धापन दिन साजरा केला आहे. तसेच यावेळी “आरंभ” संस्थेच्या ८ मुले व ७ मुली अशा एकूण १५ मुलांना पौष्टिक आहार, नॅपकिन व मास्क वाटण्यात आला.

सुरवातीला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केक कापून कार्यक्रमाला सुरूवात केली.

यांची होती उपस्थिती –

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा सौ स्वाती कुलकर्णी ह्यांनी केले. यावेळी “आरंभ” च्या उपाध्यक्षा सारिका भाग्येश्वर, सचिव सूंदरताई कोळी,व सिव्हिल मधील कार्यकर्त्या वैशाली ताई मोरे ह्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रेवती शेंदुर्णीकर, विनया भावे, सुनीता सातपुते, साधना दामले, वैदेही नाखरे, निलीमा नाईक, ज्योती भोकरडोळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला सहकार्य – 

सुनीता नाईक, अंजली धवसे, मेघा नाईक, सिंधुमती वरणगावकर, भारती लाड, माधुरी फडके, कुंदा परांजपे, सविता नाईक, मंजुषा राव, वैजयंती पाध्ये, वैशाली कुलकर्णी, आशाताई कानेटकर, अश्विनी जोशी, सुचिता कुलकर्णी, योगिनी राव, संजीवनी नांदेडकर, सरोज वाडकर, आशा बिडकर, रेखा चंद्रात्रे, विशाखा गर्गे ,ह्यांनी आर्थिक मदत केली व रुपाली टेलर ह्यांनी मास्क वाटपासाठी सहकार्य केले.

प्रत्येकी 1000 रुपयांचा 1 महिन्याचे पौष्टिक किराणा साहित्य 15एचआयव्ही पॉझेटिव्ह अनाथ मुलांना वाटण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. तसेच ह्या मुलांना आपल्या मदतीची गरज असून ज्यांना जसे सहकार्य करता येईल तसे सहकार्य करण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी ह्यांनी केले.

 

Exit mobile version