सातगाव येथे मॉ जिजाऊ जयंतीनिमित्त कीर्तन सोहळा उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथे मॉ साहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी सर्व प्रथम मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर धोबी (अहिरे) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमात निमित्त कासोदा येथील ह. भ. प. राजेंद्र महाराज यांच्या जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजेंद्र महाराज यांच्या किर्तनाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध होवुन निघाला होता. यावेळी शिवराय ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content