Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळील रेल्वे रूळावर अंदाजे ३० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पोलीसांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळील रेल्वे रूळाजवळील खंबा क्रमांक २६५ जवळ अंदाजे ३० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी ५ मार्च रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याबाबत स्टेशन मास्टर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानुसार अमळनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी बुधवारी ६ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजता अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.

Exit mobile version