Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुर्णा नदीत अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णा नदी पात्रात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णा नदीच्या पात्रात ३० ते ४० वयोगटातील अनोळखी तरूणाचा मृतदेह पाण्यात तरंगातांना आढळून आला. याबाबत मुक्ताईनगर पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्याच्याजवळ ओळख पटविण्यासारखी कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप खंडारे करीत आहे.

Exit mobile version