Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रान्सपोर्ट नगरात तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरात ट्रकचालका सोबत रात्री वाद झाला होता. त्यानंतर आज शुक्रवारी ट्रकचालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबबळ उडाली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सागर रमेश पालवे (वय-२५) रा. मालदभाडी ता. जामनेर असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक असे की, सागर पालवे हा आई व वडील यांच्यासोबत जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे वास्तव्याला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते जळगाव येथील विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कामाला होता. काल गुरूवारी ७ सप्टेंबर रोजी त्याचे काही लोकांसोबत वाद झाला होता. तर शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्याचा ट्रान्सपोर्ट नगरात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अच्छा यांनी मयत घोषीत केले. दरम्यान मयत सागर पालवे याच्या आंगावर जखमी असल्याने त्याला बेदम मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version