Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अँथेलेटीक्स स्पर्धेत किनगाव इंग्लिश मिडीयम स्कूलचे उत्कृष्ट कामगिरी

भुसावळ/यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हास्तरीय सब ज्युनियर इंग्लिश अँथेलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धा रविवारी १४ जानेवारी रोजी बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

यात १२ वर्षाआतील ६० मिटर रनिंग व लांब उडी स्पर्धेत श्रेयस शरद गावडे प्रथम तसेच १० वर्षाआतील स्टेंडींग ब्राँड जंप स्पर्धेत दिवयाणी दिलीप संगेले हिने प्रथम क्रमांक पटकावला दिव्यानी संगेले ही क्रिडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले यांची कन्या आहे, तर ६० मीटर रनिंग स्पर्धेत युगंधरा कैलास पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत प्रथम आलेले खेळाडूची .९ ते ११ फेब्रूवारी दरम्यान सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

विजयी खेळाडूंना यावल तालूका क्रिडा सचिव व दिवाकर चौधरी विद्यालय डांभुर्णीचे क्रिडा शिक्षक जितेंद्र फिरके, जिल्हा सचिव राजेश जाधव, व यावल तालुका क्रिडा समन्वयक दिलीप संगेले यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील व्हा. चेअरमन शैलेजाताई पाटील, सचिव मनिष विजकुमार पाटील, व्यवस्थापक पुनम पाटील, प्राचार्य अशोक पाटील, उप प्राचार्य राजश्री अहिरराव इ. सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version